ग्रामीण स्त्रीजीवनाचा आलेख
ग्रामीण भारतातील स्त्रियांसाठीची आरोग्यसेवा दुर्लक्षित आहे, आणि याचे परिणाम दारुण अनारोग्याच्या रूपात दिसतात, हे सर्वज्ञात आहे. मृणाल पांडे यांचे नवे पुस्तक, “स्टेपिंग आउट : लाइफ अँड सेक्शुअॅलिटी इन रूरल इंडिया’ (पेंग्विन, २००३), हे या स्थितीचा वृत्तपत्री आलेख मांडून थांबत नाही. त्यापुढे जाऊन स्त्रियांच्या आरोग्या-बाबत ग्रामीण क्षेत्रात निष्ठेने भरघोस काम करणाऱ्या अनेक बिगर-सरकारी स्वयंसेवी संस्थांकडे हे …